सोलापूर जिल्हा इंग्रजी भाषा शिक्षक संघटनेची माढा तालुका कार्यकारिणी जाहीर ; जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड यांची माहिती
करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-
सोलापूर जिल्हा इंग्रजी भाषा शिक्षक संघटनेची माढा तालुका कार्यकारिणी जाहीर केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड यांनी दिली आहे.
टेंभूर्णी येथे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण लावंड यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत माढा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रा. किशोर कुंडलिक शिंदे यांची माढा तालुका इंग्रजी भाषा शिक्षक संघटनेचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर प्रा.श्रीमती प्रमिला सहदेव वाघमारे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सचिवपदी प्रा.सुनिल मोहन गोसावी यांची तर सहसचिव म्हणून प्रा. श्रीकांत अशोक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब दाढे, जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक प्रा. गुरूनाथ मुचंडे, करमाळा तालुका इंग्रजी भाषा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. कल्याणराव साळुंके, उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान माजी जिल्हाध्यक्ष प्रा.गुरुनाथ मुचंडे, विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब दाढे यांनी केला. याप्रसंगी माढा तालुक्याचे वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.