भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी स्वतः अद्ययावत होणे गरजेचे- राज्य समन्वयक प्रा. अशपाक काझी


करमाळा, दि.१२ (करमाळा-LIVE)-
भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी स्वतः अद्ययावत होणे गरजेचे असल्याचे मत राज्य समन्वयक प्रा. अशपाक काझी यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशनच्या मंगळवेढा येथील सहविचार सभेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. काझी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डेल्टासचे नूतन जिल्हा अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, मार्गदर्शक प्रा. गुरुनाथ मुचंडे, इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे करमाळा तालुका अध्यक्ष प्रा. कल्याणराव साळुंके, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रा. गोपाळकर सर, सदस्य प्रा. यादव सर, प्रा. मोरे सर, प्रा. भोसले सर, इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे सचिव प्रा. गोपाळराव तकिक, प्रसिद्धी प्रमुख प्रा. सुखदेव गिलबिले, प्रा. विजयराव खाडे प्रा. पुरुषोत्तम माने, प्रा. बापूराव गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांसह इंग्रजी विषय शिक्षक उपस्थित होते.
यावेळी प्रा. काझी पुढे बोलताना म्हणाले की, शाळा व समाजामध्ये इंग्रजी भाषा शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण असल्याने शिक्षकांनी काळानुरूप स्वतः अद्ययावत होऊन ज्ञानदान करावे म्हणजे भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेतील सक्षम विद्यार्थी घडतील तसेच विविध ऑनलाईन व ऑफलाईन कार्यशाळा, चर्चासत्रांद्वारे राज्य समन्वयक म्हणून ई-मेल्टाच्या माध्यमातून शिक्षकांचे सक्षमीकरणावर भर देण्यासाठी अग्रेसर राहून सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोशिएशन व राज्य असोसिएशन यांचा समन्वय साधण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी नूतन जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड म्हणाले की, या पुढील काळात विविध स्पर्धांद्वारे इंग्रजी लेखन, भाषण व संभाषण असे विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवले जातील यासाठी सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नांची आवश्यकता आहे.
या सहविचार सभेवेळी मंगळवेढा तालुक्याचे वतीने अध्यक्ष प्रा. गोपाळकर यांनी नूतन जिल्हाध्यक्ष प्रा.लावंड यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.




