जेऊर येथे उद्या इरा पब्लिक स्कूलचे उद्घाटन
जेऊर, दि. १ (करमाळा-LIVE)-
ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणारी न्यू इरा पब्लिक स्कूल चिखलठाण ची दुसरी शाखा जेऊर येथे सुरू होणार असून उद्या जेऊर येथे उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या रविवारी २ जूनला सकाळी १० वाजता माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ बाबुराव हिरडे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील तसेच माजी सभापती अतुल पाटील उपस्थित राहणार आहेत.
२०१५ मध्ये चिखलठाण येथे इरा पब्लिक स्कूल सुरू झाले होते, आज तिथे बालवाडी ते बारावी पर्यंत वर्ग आहेत. आतापर्यंत हजारो विद्यार्थी घडलेले असून जरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा आजही कायम आहे. शिक्षणाबरोबर शाळेत विविध उपक्रम राबविले जातात.
जेऊर येथे उद्या दुसरी शाखा सुरू होत असून एलकेजी, युकेजी, तसेच पहिली ते चौथी पर्यंत चे वर्ग या शैक्षणिक वर्षांंपासून सुरू होणार आहे. जास्तीतजास्त जणांनी उपस्थित रहावे अशी मागणी संचालक मंडळाने केली आहे.