ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या न्यू इरा पब्लिक स्कूलच्या दुसऱ्या शाखेचे जेऊर येथे उद्घाटन
East or West ——– Era Is the Best
जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-
ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणारी न्यू इरा पब्लिक स्कूल चिखलठाण ची दुसऱ्या शाखेचे जेऊर येथे उद्घाटन पार पडले.काल रविवारी २ जूनला सकाळी १० वाजता राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते सर्व क्लास रूमची फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जेऊर गावचे सरपंच पृथ्वीराज पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. बाबुराव हिरडे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, माजी सभापती अतुल पाटील, उपसरपंच नागेश शेठ झांजुर्णे, राजुशेठ गादिया, भास्कर कांडेकर, संदीप शेठ कोठारी, अमर ठोंबरे, धनंजय शिरसकर, सुरेश नाना जाधव, पांडुरंग वाघमारे, मयूर रोकडे, नितीन कदम, गजेंद्र पोळ आदी उपस्थित होते.
यावेळी जेऊर, वांगी, भाळवणी शेलगावं व दहिगावं या पंचक्रोशीतील अनेक पालक उपस्थित होते.
२०१५ मध्ये चिखलठाण येथे इरा पब्लिक स्कूल सुरू झाले होते, आज तिथे बालवाडी ते बारावी पर्यंत वर्ग आहेत. आतापर्यंत हजारो विद्यार्थी घडलेले असून जरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा आजही कायम आहे. शिक्षणाबरोबर शाळेत विविध उपक्रम राबविले जातात.
जेऊर येथे यावर्षी पासून दुसरी शाखा सुरू होत असून एलकेजी, युकेजी, तसेच पहिली ते चौथी पर्यंत चे वर्ग या शैक्षणिक वर्षांंपासून सुरू होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव सुनील अवसरे व संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड यांनी केले, यावेळी गणेश करे-पाटील, ॲड बाबुराव हिरडे व अतुल पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
इरा पब्लिक स्कूल विषयी बोलताना श्री करे-पाटील म्हणाले की, मी गेल्या नऊ वर्षात सतत इरा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात चमकताना पाहत आहे, “जसे की स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा ,डान्स स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा कोणत्याही स्पर्धांमध्ये इरा पब्लिक स्कूल ही अव्वल असते.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूलचे मुख्याध्यापक कसबे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अवसरे मॅडम यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ, व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.