17/12/2024

गेल्या पाच वर्षांत तालुक्याचा विकास खुंटला ; युवकांनी सत्ता परिवर्तनाची भूमिका बजवावी

0
IMG-20240615-WA0029.jpg

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)-
युवकांमध्ये सत्ता परिवर्तन करण्याची ताकद असून गावगाड्यातील सक्रिय युवकांनी आता तालुक्याच्या सत्ता परिवर्तनामध्ये महत्वाची भूमिका बजावली पाहिजे असे आवाहन माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले.

पोंधवडी येथील आयोजित सभेत ते बोलत होते. माजी आमदार नारायण पाटील यांच्या जनसंवाद गावभेट दौऱ्यात आज पोंधवडी येथे गावभेट दौरा संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर माजी सभापती अतुल पाटील, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व राजूरीचे माजी सरपंच डॉ अमोल दुरंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमोडे, सरपंच मनोहर कोडलिंगे, उपसरपंच कांताबाई भागवत गाडे, हनूमंत खरात, अमोल गाडे, वसंत भिसे, आबा कोडलिंगे, पांडुरंग कोडलिंगे,अर्जून नवगीरे, मधुकर भिसे, ग्रामपंचायत सदस्य शालन भिसे,नागदेव कोडलिंगे, ग्रामपंचायत सदस्य मनिषा कांबळे,पुजारी पोपट शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, करमाळा तालुक्यातील विकास खुंटला असल्याने तालूका याबाबत पाच वर्षे मागे गेला आहे. आमच्या विरोधकांनी कितीही आदळ आपट केली तरी आयत्या पीठावर रेघोट्या मारुन कोरोना कालावधीचे कारण सांगून आपली जबाबदारी कोणी टाळली हे जनता जाणून आहे. विकासकामे ही ठळकपणे दिसून येतात. जनतेच्या नजरेत बसतात.

आज तालुक्याच्या अनेक भागात रस्त्याची दुरवस्था आहे हे मान्य करावेच लागेल अन्यथा हा जनभावनेचा अपमान आहे. गेली तीन वर्षे झाली नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजने बाबत विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडला गेला का ? याबाबत शेतकऱ्यांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची वेळ का यावी ? हे प्रश्न जनता सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांना विचायणार आहे. यामुळे आता किमान करमाळा तालुक्यातील जनतेची दिशाभूल करुन कोणताही उपयोग होणार नाही. युवकांनी सुध्दा २०२४ मध्ये बदल करून दाखवण्याचा निर्धार केला असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

सूत्रसंचालन एन पी मिशन २०२४ सोशल मीडिया तालूकाप्रमुख संजय फडतरे यांनी केले. तर आभार सरपंच मनोहर कोडलिंगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page