करमाळ्यातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)-
करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून त्यांना अगोदरच उमेदवारी जाहीर झालेली होती.
आज करमाळा विधानसभेसाठी त्यांनी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी स्वीकारला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे हे देखील उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता देवीराजे भोसले, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, नवनाथ झोळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, देवानंद बागल, प्रवक्ते सुनील तळेकर आदी उपस्थित होते.