जेऊर येथे गजराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जेऊर येथील गजराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती चषक 2023 ही स्पर्धा मंगळवार दि. 10 मे ते 14 मे दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचे सर्व सामने युट्युब वरून लाईव्ह पाहता येणार आहेत. मध्ये ही पाहता येणार आहेत.
स्पर्धेतील बक्षीसे पुढीलप्रमाणे-
1) प्रथम बक्षीस- 51000/- आणि ट्रॉफी
2) द्वितीय बक्षीस- 31000/- आणि ट्रॉफी
3) तृतीय बक्षिस- 21000/- आणि ट्रॉफी
4) चतुर्थ बक्षीस- 11000/- आणि ट्रॉफी
सदरील बक्षीस वितरण 14 मेला रोजी अंतिम सामना झाल्यावर होणार असल्याचे गजराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक सुरवसे, उपाध्यक्ष राहुल (नाना) घोरपडे यांनी सांगितले. स्पर्धेतील सर्व सामने जेऊर येथील मार्केट यार्ड येथील मैदानावर होणार आहेत.