08/06/2025

फौजदार झालेल्या नातीची आजोळात मिरवणूक

0
IMG-20230713-WA0025.jpg
सावंत हॉस्पिटल करमाळा

करमाळा, दि. 14 (करमाळा-LIVE)-
मुलगी म्हणजे दोन घरी प्रकाश पाडणारी पणती असते. माहेरी तसेच सासरी ती आपल्या तेजाचा प्रकाश देते. मात्र आज एक मुलीने पीएसआय होवून आजोळाचे देखील नाव उज्ज्वल केल्याने आजोळातील मंडळीनी वाजत गाजत मिरवणूक काढून आपल्या नातीचे कौतुक केले आहे.

गुळसडी (करमाळा) येथील विद्या किसन कळसे हिने पहिल्याच प्रयत्नात एम पी एस सी परिक्षेत घवघवीत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातल्याने सौंदे येथील आजोळातील मंडळीने वाजत गाजत मिरवणूक काढून जंगी स्वागत केले.

त्याचबरोबर सौंदे येथील कन्या मेघावर्णा रवींद्र साळुंके हिने निट परिक्षेत ९१ टक्के गुण मिळाल्याबद्दल व इयत्ता दहावी मध्ये गुळसडी येथील विठाबाई माध्यमिक विद्यालयात शिकत असलेल्या भक्ती भालचंद्र पाटील (प्रथम क्रमांक ८७.८०%), आकांक्षा बिभिषण ढमढेरे (द्वितीय क्रमांक ८७ .२०%), शिवानी सोमनाथ खरात (तृतीय क्रमांक ८०.२०%) यांनी देखील घवघवीत यश मिळाल्याबद्दल त्यांची देखील मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना तालुकाप्रमुख तथा पत्रकार शंभूराजे फरतडे यांच्यासह सौंदे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच बाळनाथ शेती समुह गटाचे सर्व सभासद उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य तात्याराम आवटे, सरपंच जोतीराम लावंड, उपसरपंच उमेश वीर, सदस्य पोपट आवटे, गोरख आवटे, विजय आवटे, सोसायटी चेअरमन दत्तात्रय जगताप, विशाल मोरे, नागनाथ आवटे, सतिश पाटील माजी सरपंच रघुनाथ साळुंके, रवींद्र गायकवाड, जोतीराम आवटे, हणुमंत सावंत, तात्याराव आवटे, कल्याण आवटे आदींनी परिश्रम घेतले.

सुत्रसंचालन व प्रास्ताविक शाळा समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांनी तर आभार तात्याराम आवटे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page