08/06/2025

करमाळ्यात विविध मागण्यांसाठी ‘महादेव कोळी’ समाजाचा हलगीनाद मोर्चा

0
IMG-20241004-WA0014.jpg

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-
सकल महादेव कोळी समाजाच्या वतीने करमाळा तहसिल कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

या हलगीनाद मोर्चा ची सुरुवात कानाड गल्ली येथील महर्षि वाल्मिकी मिञ मंडळ समाज मंदिर येथून करण्यात आली व करमाळा शहरातील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, २५ सप्टेंबर २०२४ पासून महादेव कोळी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सोलापूर येथे समाज बांधव आमरण उपोषणास बसलेले आहेत. महादेव कोळी समाज हा अनुसुचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट असताना देखील जातीच्या दाखल्याबाबत शासनाने अनेक जाचक अटी घातल्या आहेत. त्या सर्व रद्द करून सुलभ पद्धतीने जातीचे दाखले मिळावेत. तसेच विविध प्रश्नांबाबत हे बांधव प्राणांतिक उपोषण करीत आहेत. तसेच सोलापूर येथे चालू असलेल्या कोळी समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.

यावेळ सकल महादेव कोळी समाज करमाळा शहर व तालुक्यातील बंधू-भगिनी व कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page