हिंगणी येथे रक्तदान शिबीर संपन्न

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)-
हिंगणी येथे श्री भैरवनाथ प्रतिष्ठान गणेश उत्सव निमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले.
हिंगणी गावातील व पंचक्रोशीतील सर्व रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. श्री भैरवनाथ प्रतिष्ठान च्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात आली. या शिबिरात एकूण ८६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदानामुळे अनेक लोकांना जीवनदान मिळते म्हणून दरवर्षी भैरवनाथ प्रतिष्ठान गणेश उत्साहामध्ये रक्तदान शिबिर व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.