हिंगणी येथे भैरवनाथ प्रतिष्ठान व हनुमंत पाटील मित्र मंडळच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी


करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-
हिंगणी येथे भैरवनाथ प्रतिष्ठान व हनुमंत पाटील मित्र मंडळच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शिवप्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांचे मनोगत, शालेय विध्यार्थ्यांना वही पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प माऊली महाराज निंबाळकर रायगावकर यांचे शिवचरित्र वर हरिकीर्तन झाले. यासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे व शिवप्रेमीचे श्री भैरवनाथ प्रतिष्ठान व हनुमंत पाटील मित्र मंडळ यांच्या कडून आभार मानण्यात आले.

