हिसरे- फिसरे रस्त्यावरील पुल ठरतोय जीवघेणा ; पावसामुळे पुलावरून वाहतेय पाणी- वाहन चालकांची कसरत
करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
हिसरे ते फिसरे या रस्त्यावर हिसरे गावाजवळ असणारा पुल जीवघेणा ठरत असून ह्या पुलाला मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहैत तर आज झालेल्या पावसात पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूकीची कोंडी झालेली आहे.
या पुलाखाली असणाऱ्या सिमेंट नळ्या ह्या लहान असल्यामुळे या मध्ये जास्त पाऊस झाला की पाणी बसत नाही त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहत असते. एखादा मोठा पाऊस झाला की ह्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते आणि वाहतूक खोळंबली जाते. यामुळे विद्यार्थी, प्रवासी तसेच वाहतूकदार यांचे हाल होत असतात. या रोडवरून हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव तसेच गौंडरे या गावातील लोक प्रवास करतात.
या अशा पाणी वाहण्यामुळे अचानक प्रवास करणारा हा अडकून बसतोय. या मुळे एखादा अपघात घडू शकतो. याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे. या कडे तत्काळ लक्ष्य देऊन पुलाचे काम करावे अशी मागणी केली जात आहे.