08/06/2025

हिसरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नवनाथ जगदाळे यांची बिनविरोध निवड

0
IMG-20230109-WA0032.jpg

करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील हिसरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नवनाथ जगदाळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे.

ग्रामपंचायतचे माजी सरपंच सोमनाथ ठोंबरे यांनी राजीनामा दिल्यामुळे या पदावर रिक्त झाल्यामुळे सरपंच पदाची फेर निवड करण्यात आली. यामध्ये सदस्य सोमनाथ ठोंबरे, गणेश अर्जुन जगदाळे, जयश्री मोहन जगदाळे, आक्काबाई गजेंद्र सातपुते, निकीता गौतम ओहोळ, अश्विनी गहिनीनाथ बनसोडे, साधना काळे आदी उपस्थित होते.

यावेळी अधिकारी म्हणून सर्कल, तलाठी, सस्ते भाऊसाहेब, ग्रामसेवक रणशिंग भाऊसाहेब यांनी काम पाहिले. या निवडणूक कार्यक्रमासाठी गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील रखडलेली विकास कामे मोठ्या ताकदीने करणार, तसेच लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असे वक्तव्य नूतन सरपंच नवनाथ जगदाळे यांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page