17/12/2024

Sunday Special: एमबीए (MBA) पास युवकाने बलाढ्य पगाराची नोकरी सोडली अन् झाला हॉटेल व्यावसायिक- कुंंभेज फाटा येथील हॉटेल मानसी खवय्यांसाठी ठरतेय मेजवानी

0
IMG-20221211-WA0035.jpg

जेऊर, दि. 11 ( करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एका (MBA) युवकाने बलाढ्य पगाराची नोकरी सोडून हॉटेल व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली असून त्याची ही वाटचाल तरूणाला प्रेरणादायक ठरत आहे.

आयुष्यात जर प्रबळ इच्छा शक्ती असेल तर इच्छा शक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आपल्या समोर आली आहे. जेऊर येथील युवक वैभव शिवाजी कादगे यांनी 2012 साली एमबीए (MBA) केले, त्यानंतर सोलापूर आणि पुणे येथे मार्केटींग मध्ये नोकरी केली, 6-7 वर्षे काळात नोकरी करीत असताना आपण काहीतरी करू शकतो, व्यवसायात मोठे होऊ शकतो हे उराशी बाळगून वैभव कागदे यांनी टेंभूर्णी-नगर हायवेवर जेऊर पासून 4 किमी अंतरावर कुंभेज फाटा येथे हॉटेल व्यावसाय सुरू केला.

मानसी हॉटेल आणि लॉज चा शुभारंभ झाल्यापासून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, करमाळा परिसरात मासांहारी (नॉन व्हेज) साठी हॉटेल मानसी आता फेमस झालेले आहे.

पंढरपूर आणि शिर्डी या दोन देवस्थानच्या महामार्गावरील हे हॉटेल खवय्यांसाठी फेमस झालेले असून जिभेची चोचले याठिकाणी भरून निघत आहे.

मानसी हॉटेलमध्ये सध्या मटन थाळी चिकन थाळी, मच्छी थाळी फेमस असून, कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा आता कुंभेज फाटा येथे मिळत असल्यामुळे खवय्यांना आता कोल्हापूरी चव येथे मिळत आहे.

स्पेशल मटन थाळी आणि चिकन थाळी मध्ये तांबडा-पांढरा रस्सा, सुक्क मटन, बाॕईल अंडे, राईस, बाजरी भाकरी, कोशिंबीर, सुप आहे तर स्पेशल मानसी मच्छी थाळी मध्ये कडक मच्छी, तवा मच्छी, उक्कड मच्छी, राईस, बॉईल अंडे आणि कोशिंबीर, बाजरी भाकरी अशाप्रकारची मेजवानी मिळत आहे.

हॉटेल व्यवसाय सुरू केल्याने सध्यातरी महिन्याला लाखोंची कमाई होत असून वैभव कागदे यांनी 2017 मध्ये नोकरी सोडली आणि हॉटेल मानसी सुरू केले प्रथम शुध्द शाकाहारी (प्युअर व्हेज) हॉटेल सुरू केले परंतु ग्राहकांची रेलचेल, नॉन व्हेज ची होणारी मागणी लक्षात घेता नॉन व्हेज डिपार्टमेंट हॉटेल मध्ये सुरू केले, कुंभेज फाटा आसपास अनेक नॉन व्हेज हॉटेल आहेत, परंतु ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खायला मिळण्यासाठी वेगळ्या प्रकारचे पदार्थांची मेजवानी हॉटेल मानसी मध्ये सुरू करण्यात आले आहे.

हॉटेल बरोबर लॉज ही सुरू करण्यात आले असून चांगल्या प्रकाराचे आणि हवेशीर असे लॉज ग्राहकांसाठी आणि फॕमिलीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

नोकरी करीत असताना, व्यावसायात उतरून काहीतरी करायची इच्छा होती, 6-7 वर्षे मार्केटींगमध्ये काम करीत असताना पुणे-सोलापूर-लातूर-बीड अशा अनेक ठिकाणी काम करण्याचा योग आला, कामानिमित्त वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाण्याचा योग आला आणि ठरवले हॉटेल व्यावसायिक व्हायचे, या सगळ्या यशामध्ये वडील शिवाजी कादगे आणि आई शालन कादगे यांचे खूप मार्गदर्शन लाभले, पत्नी भाग्यश्री हीची खूप मोठी साथ मिळाली.
-वैभव शिवाजी कादगे, हॉटेल मानसी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page