जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व समजून सांगणाऱ्या भारत देशामध्ये आज मोठ्या प्रमाणात योग दिन साजरा करण्यात आला विविध ठिकाणी विविध शाळांनी आपापल्या पद्धतीने योग दिन साजरा केला. त्याच पद्धतीने आज भारत प्रायमरी स्कूलमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला.
सकाळी ७.३० ला स्कूल मधील सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक या दिनासाठी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना योगशिक्षक उदय केकान यांनी योग्य प्रकारे योगासनाचे धडे दिले. यामध्ये त्यांनी विविध प्रकारचे १५ ते २० योगासने चांगल्या करून घेतली. मुलांनी अतिशय आवडीने योगासने केली.
सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमपणे योगासने केली. विद्यार्थ्यांमध्ये या निमित्ताने आज व्यायामाची खूपच आवड असल्याचे दिसून आले. योगासनाच्या विविध प्रकारामध्ये पद्मासन, वज्रासन, कपाल भाती, लोम, अनुलोम इत्यादी योगासने करून घेतली, तसेच विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार ही शिकवला तसेच, सूक्ष्म व्यायाम प्रकारे करून घेतले
शेवटी उदय केकान यांनी योगासनाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांकडून दररोज योगासने करणार असल्याचे अभिवचन घेतले.
यावेळी सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक यांच्यातर्फे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांनी उदय सर यांचे आभार मानले. यावेळी भारत प्रायमरी चे सर्व शिक्षक व भारत माँटेसरीचे सर्व शिक्षक उपस्थित होते. उदय केकान यांनी वेळोवेळी सहकार्य करण्याचे मान्य केले या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, सचिव अर्जुनराव सरक, संस्थेचे संचालक पृथ्वीराज पाटील या सर्वांनी अभिनंदन केले.