जेऊरच्या ‘माहेरच्या कट्ट्यावर’ योग दिन उत्साहात साजरा-
जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE वृत्त सेवा)-
21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस जेऊर येथे साजरा करण्यात आला. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत,आज योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. सद्यस्थितीमध्ये योगसाधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे.
योगा मुळे चित्तस्य, पदेन वाचा, मलं शरिरस्य च वैद्यकेन, उपकारोत मुनीनां पतंजली प्रांजली नतो अस्मी. या प्रमाणे जेऊर येथे गेली 7-8 वर्षे नियमित दररोज योगाभ्यास करणारे सगळ्या सख्या आज उत्साहने योग दिनानिमित्त उपस्थितीत होत्या.
चित्त वृत्ती निरोधः हा योगाचा महत्वाचा गाभा, वाणी स्नेहाची
आणि निरोगी शरीर ही देणगी महर्षी पतंजलीं च्या योगाची यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान.
धारणा आणि समाधी, हा अष्टांग योग. आम्ही मिळून सगळ्या सख्या हे नियमित करीत आहोत. आणि आज हा खास उत्सवाचा दिवस. जागतिक योग दिवस.
दररोज हास्य योग. चित्त वृत्ती पुलकीत होण्यासाठी. ताणतनाव मुक्त होण्यासाठी हास्य योग.
हा ‘माहेरचा कट्टा’ म्हणून ही ओळखला जातो.