24/06/2025

करमाळ्यात योग दिन उत्साहात साजरा- भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटेंनी केले होते आयोजन

0
IMG-20250621-WA00151.jpg

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून करमाळा शहरात दिनांक २१ जून रोजी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याकार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.०० वाजता शहरातील कन्या हायस्कूल मैदानावर करण्यात आली. यावेळी शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून योगाभ्यासात सहभाग घेतला. विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक देण्यात आले. प्रशिक्षित योग प्रशिक्षक हनुमानसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व समजून घेतले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस
गणेश चिवटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “योग हे फक्त व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र ठेवणारी कला आहे. दररोजच्या जीवनशैलीत योगाचा समावेश केल्यास आपले आरोग्य उत्तम राहते. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जगाला पटवून दिलेली हि योग दिनाची संकल्पना आपण अंगिकारून आजपासून दररोज योग करावेत असे आवाहन चिवटे यांनी यावेळी केले तसेच या योग शिबिरामध्ये हनुमानसिंग परदेशी, भीष्माचार्य चांदणे, चव्हाण सर यांनी योगा बद्दल माहिती दिली,
या योग शिबीरासाठी जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, प्रमोद फंड, बाळासाहेब कुंभार, पतंजली योग समितीचे राजूकाका वाशिंबेकर, प्रदिप वीर, पत्रकार दिनेश मडके, पूजा माने, नानासाहेब अनारसे, पप्पू शिंदे ,गणेश माने, कमलेश दळवी, प्रवीण गायकवाड, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुक्ता शेलार मॅडम, भीष्माचार्य चांदणे, चव्हाण सर, प्रवीण बिनवडे, पोपटराव शिंदे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही योगप्रात्यक्षिकात भाग घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश चिवटे यांच्यासोबत स्थानिक स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि आरोग्य विभागाने मोलाचे सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page