05/01/2025

जनशक्ती’च्या अतुल खूपसे यांचा नारायण आबा पाटील यांना पाठिंबा ; पाठिंब्यामुळे आबा पाटलांचे पारडे जड

0
IMG-20241115-WA0028.jpg

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)-
सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या करमाळा विधानसभा निवडणुकीत चांगलाच रंग भरला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नारायण पाटील यांना चर्चेतील आणि चळवळीतील नेते जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघात तुतारीचे पारडे जड झाले आहे.

अतुल खूपसे-पाटील यांचं करमाळा तालुक्यासह मतदारसंघात आणि जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे मोठं जाळं आहे. खासकरून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचा कडवा विरोधक अशी अतुल खुपसे यांची तालुक्यासह जिल्ह्यात ओळख आहे. संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतले होते. यासंदर्भात शेतकऱ्यांना नोटीस आल्यानंतर अनोख्या स्टाईलने आंदोलन करून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता.

गतवेळेस झालेल्या विधानसभा निवडणुकीत खुपसे-पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी लढवली होती आणि याच निवडणुकीत नारायण पाटील यांचा थोड्या थोडक्या मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे यंदाची मतविभागणी टाळण्यासाठी अपक्ष उमेदवारी लढविण्याच्या तयारीत असलेले अतुल खुपसे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेऊन आठवडाभर गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांची चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार नारायण पाटील यांना पाठींबा दिला आहे.

जनशक्तीचा कार्यकर्ता उमेदीने काम करणार

करमाळा तालुक्यातील आणि माढा तालुक्यातील ३६ गावांचा या ५ वर्षात विकास नव्हे तर भकास केला आहे. गेल्यावेळी मला पडलेली सर्व मतं नारायण आबांच्या पारड्यात टाकली असती तर आमचा विरोधक आमदार झाला नसता. त्यामुळे यंदा देखील ही दुफळी आणि मतविभागणी टाळण्यासाठी मी नारायण आबांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या अटीवर पाठींबा जाहीर केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page