18/12/2024

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या प्रयत्नातून जातेगाव ला एक कोटी २० रुपये लाख रुपयांचा निधी मंजूर

0
images-65.jpeg

करमाळा, दि. 11 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जातेगावं येथील ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी एक कोटी वीस लाखाचा निधी मंजूर झाला असून त्याचा शासकीय आदेश निघाला आहे यामधून बारा रस्त्यांची कामे सुचवण्यात आली आहे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत मार्गदर्शनाखाली ही मिळून दिल्याबद्दल जातेगाव ची जनता धन्यवाद देत आहे.

जातेगाव येथील अनेक प्रलंबित प्रश्नासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे व सरपंच छगन ससाने जातेगावच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे केली होती.


याचा पाठपुरावा करून मंत्रालयातून यांनी मंजूरी मिळाली आहे. यामध्ये पोपट पोळ घर ते सुनील शिंदे घर. रमेश शिंदे ते राहुल शिंदे यांचे घर. सुनील शिंदे ते काशिनाथ कामटे. यशवंत शिंदे ते दत्तात्रय माने यांचे घर. दत्तात्रय माने ते बलभीम काकडे यांचे घर. हरी शिंदे यांचे घर ते भैरवनाथ मंदिर गोरख गोरख धुमाळ ते सुनील कामठे यांचे घर. या सात रस्त्यासाठी सिमेंट रस्ता करण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. जातेगाव ते वडगाव रस्ता खडीकरण करणे दहा लाख रुपये. अण्णाभाऊ साठे सभागृह बांधणे दहा लाख रुपये. जुना करमाळा रस्ता दुरुस्त करणे दहा लाख रुपये. सार्वजनिक सभागृह बांधणे दहा लाख रुपये. जातेगाव ते दिघी रस्ता दुरुस्त करणे दहा लाख रुपये. या पद्धतीने बारा कामांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे 1 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

जातेगाव मधील विकास कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या माध्यमातून जातेगाव ला भरघोस निधी मिळवून दिला आहे यामुळे जनता समाधानी असून जातेगाव मधील उर्वरित प्रलंबित कामे सुद्धा शासनाने मार्गी लावावीत.

छगन ससाने, सरपंच जातेगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page