08/06/2025

नॕशनल अबॕकस स्पर्धेत जेऊरचे विद्यार्थी चमकले: जेऊरची ईश्वरी काशिद सात जिल्ह्यातून प्रथम

0
IMG-20230101-WA0029.jpg

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-
नॕशनल अबॕकस स्पर्धेत जेऊर येथील जिनिआस अबॕकसचे विद्यार्थी चमकले असून जेऊरची ईश्वरी काशिद चा सात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला आहे.

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातून पुणे येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत एकूण 8450 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता, यासर्व विद्यार्थ्यांमधून जेऊरच्या ईश्वरी सोमनाथ काशिद (इयत्ता तिसरी) हिने लेवल 1 च्या परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

तसेच लिटिल चॅम्प लेवल मध्ये असरलान जावेद फकीर याने पाचवा क्रमांक मिळविला आहे. तसेच लेव्हल 1 च्या परीक्षेत अंजनडोह येथील श्रीराम केतन पाटील याचा चौथा क्रमांक आला आहे. 8450 विद्यार्थी मधून वरील 3 विद्यार्थ्यांची पुढील होणाऱ्या इंटरनॅशनल लेवल परिक्षेत साठी निवड झाली आहे.

तसेच 22 विद्यार्थी गोल्ड मेल्डलिस्ट मिळवून यशस्वी झाले आहेत. लिटिल चॅम्प लेवल मध्ये दर्श रणदिवे, उमेरा फकीर, सिद्धी गुळवे, गौरी शिंदे, तनिष्क सुरवसे, रणवीर पाटील, शाश्वत सुतार हे विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट ठरले आहेत तर लेवल 1 च्या परीक्षेत पार्थ वाघमोडे, शौर्यतेज रोकडे, सुयश चव्हाण, श्रुती गुंडगिरे, अनन्या मंजरतकर, शिवतेज मंजरतकर यांना ही गोल्ड मेडल्स मिळाले आहेत. तसेच लेवल 2 च्या परीक्षेत ईशान फकीर, आरोही पाटील, अनन्या पाटील, शारण्या साळुंखे, आदित्या पाटील, हे देखील गोल्डमिस्ट ठरलें आहेत. तर लेवल 3 च्या परीक्षेत वेदांती निमगिरे, रिदा फकीर या देखील गोल्डमिस्ट च्या मानकरी ठरल्या आहेत.

वरील सर्व विद्यार्थ्यांना जिनियस क्लासच्या संचालिका कु.अंकिता वेदपाठक व मुलांचे आई वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन भेटले. तसेच प्रोअक्टिव कंपनी चे डायरेक्ट अजय मणियार, गिरीश करडे, संचालिका सारिका करडे, ज्योती मणियार, तसेच हेड ऑफ डिपार्टमेंटच्या तेजस्विनी सावंत, तसेच रेखा मॅडम, प्राजक्ता मॅडम, आद्या करडे यांचे देखील मोलाचे सहकार्य मिळाले.

पुढील परिक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सलून असोसिएशन महाराष्ट्र राज्य व जेऊर नाभिक संघटना आणि जेऊर संभाजी ब्रिगेडच्यावतीने सत्कार करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page