सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-
सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित वन्यजीव सप्ताह स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय आलेली आहे.
सोलापूर जिल्हा वनीकरण विभागाकडुन वन्यजीव सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची इयत्ता सहावी ची आरूषी सागर बादल हीने घरटे बनविणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. तर शिल्पकला बनविने या स्पर्धेत शिवानी सिध्देश्वर कुंभार हीचा तृतीय क्रमांक आला आहे. दोघींनाही सोलापूर येथे ट्राॕफी आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच भारत हायस्कूल येथेही दोघींचा सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, सचिव प्रा. अर्जूनराव सरक, प्राचार्य आबासाहेब सरोदे, उपप्राचार्य एन.डी कांबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.