जेऊरच्या भारत शैक्षणिक संस्थेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
जेऊर, दि. १७ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत शैक्षणिक संस्थेत भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य दिनी सकाळी जेऊर मधून संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भारत देशाविषयी विविध घोषणा दिल्या. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले व जेऊरचे मंडळाधिकारी ठाकर साहेब यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी निवडक विद्यार्थ्यांनी आपली भाषणे सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास व आपल्या देशाविषयीचे प्रेम व्यक्त केले. तसेच यावेळी माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली तसेच बँड पथकाचे संचालन यांनी केले.या कार्यक्रमास सरपंच पृथ्वीराज भैया पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल गादिया, संस्थेचे सचिव अर्जुन सरक, भारत महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत शिंगाडे, प्राचार्य, केशव दहीभाते, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, उपप्राचार्य एन डी कांबळे, पर्यवेक्षक बी.एस. शिंदे, संस्थेचे संचालक सुनील बादल, संचालक सुनील तळेकर, संचालक संजय दोशी, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोठारी तसेच सर्व जेऊर मधील ग्रामस्थ व परिसरातील पालकांची उपस्थितीत होते.यावेळी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. तसेच माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगद पठाडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री दिपक व्यवहारे सर यांनी मानले.