नववे पुण्यस्मरण : जेऊर परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आणि यशस्वी जीवनाचा मूलमंत्र देणारे- कै मु.ना कदम सर


जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुलाचे संस्थापक आणि माजी प्राचार्य कै मु. ना कदम सर यांची काल 3 फेब्रुवारीला नववी पुण्यतिथी झाली. त्यांच्या स्मरणात भारत हायस्कूलच्या प्रांगणात 23 आॕगस्ट 2019 रोजी पुर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभारण्यात आलेले आहे.
कै मुरलीधर नागनाथ उर्फ मु.ना कदम सरांनी भारत शैक्षणिक संकुलात खूप मोठे योगदान दिलेले आहे. कै मु.ना. कदम सरांचा जन्म 8 मार्च 1929 रोजी झाला. लहानपणी आई-वडीलांचे छत्र हरपले, स्वःताच्या बळावर त्यांनी पदवीचे शिक्षण सोलापूरात तर बी.टी चे शिक्षण पुणे येथे घेतले. त्यांनतर त्यांनी सोलापूरात लोणकर शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली.

1952 रोजी जेऊर सारख्या गावा मध्ये लोणकर प्रशालेची शाळा जेऊर मध्ये सुरू झाली आणि मुख्याध्यापक म्हणून कदम सर ज्वाईन झाले परंतु काही वर्षांनी ही शाळा बंद झाली. त्या काळातील शिक्षणाची गरज ओळखून कदम सरांनी भारत शैक्षणिक संस्थेची स्थापना केली आणि दीर्घकाळ या हायस्कूलचे प्राचार्य ही होते.
अनेक विद्यार्थी घडविले. त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस हा त्यांचा कायमस्वरूपी मित्र, हितचिंतक होत असे. हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मु.ना कदम सरांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक मुलात काहीतरी दडलेले असतेच. त्यास हिऱ्याप्रमाणे पैलू पाडण्याची, त्याच्यातील गुणवैशिष्ट्ये शोधण्याची व त्याला प्रगतीची संधी देण्याची भूमिका त्यावेळी कदम सरांनी घेतली. कदम सरांनी ग्रामीण भागातील प्रज्ञावान, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी जेऊर येथे 1972 मध्ये मोफत वसतिगृहयुक्त हायस्कूलची स्थापना केली. या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष तसेच प्राचार्य ही होते. कदम सरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अप्रतिम बदल घडवून आणला आहे.संस्कारांची निर्मिती व रुजवणूक करण्यात आजचे शिक्षण अपयशी ठरले आहे. शिक्षण वळण राहिले नसून दळण बनले आहे. विद्यार्थ्यांची संख्यात्मक वाढ झाली पण गुणात्मक वाढ सध्या कमी झालेली आहे, कदम सरांनी त्यावेळी केलेल्या योगदानामुळे अनेक विद्यार्थी घडले. 3 फेब्रुवारी 2016 ला कै. मु.ना कदम यांचे निधन झाले.
या दिलेल्या योगदानाबद्दल कै मु. ना. कदम सर यांचे पुर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक भारत हायस्कूलच्या प्रांगणात हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन केले आहे.



- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर