जेऊरच्या भारत शिक्षण संस्थेत बालोद्यानचे उद्घाटन

जेऊर, १८ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथीलभारत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मैदानावर कर्मयोगी गोविंदबापू बालोद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.बालोद्यानाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष अनिल गादिया संस्थेचे सचिव अर्जून सरक, संस्थेचे सदस्य संजय कुमार दोशी, पात्रुडकर काका, संदिप कोठारी, उपसरपंच नागेश झांजुर्णे, संस्था सदस्य सुनील बादल, शेरखान नदाफ तसेच भारत प्रायमरी चे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, भारत हायस्कूलचे प्राचार्य सरवदे सर भारत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनंत शिंगाडे, शिंदे बी.एस, प्रा. वाघमोडे, क्रीडा शिक्षक बाळासाहेब सरक सर उपस्थित होते.संस्थेतील सर्व विभागातील शिक्षक यावेळी उपस्थित होते व शिक्षक वृंद या सर्व मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी गोविंद बापू बालोद्यान आज सर्व भारत माँटेसरी भारत प्रायमरी स्कूलच्या बाल गोपाळांना खुले करण्यात आले.या बालोद्यानामुळे संस्थेतील लहान मुलांना खेळण्यासाठी उत्तम बगीच्या, इतर खेळाची साधने उपलब्ध झाली आहेत अशी प्रतिक्रिया नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केली.