जेऊरचे भारत शैक्षणिक संकुलाचे शिक्षण क्षेत्रातील योगदान शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारे- माजी आमदार दत्तात्रय सावंत
जेऊर, दि. 31 (करमाळा-LIVE)-
भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षण क्षेत्रातील योगदान ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारे आहे असे मत पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले.
जेऊर येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या व्यावसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा. अर्जून सरक यांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य साधून तसेच भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचीवपदी निवड झाल्याबद्दल एका सेवापुर्ती ऋतज्ञता सोहळा व ग्रंथतुला समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार दत्तात्रय सावंत होते तर माजी आमदार नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या समारंभाच्या निमित्ताने नामांकित विचारवंत व लेखक प्राचार्य डाॅ महेंद्र कदम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. “ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने व संधी” या विषयावर त्यांनी आपले मौलिक विचार मांडले. सेवापुर्ती निमित्ताने प्रा अर्जून सरक यांची ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी बोलताना माजी आमदार सावंत यांनी प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असून नारायण पाटील यांच्याशी आपले ऋणानुबंध घट्ट राजकारणापलिकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर भारत शैक्षणिक संकुलातील प्रत्येक घटक हा गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असून त्याचे प्रतिबिंब दहावी व बारावीच्या तसेच विद्यापीठाच्या पदवी परिक्षेच्या निकालातुन उमटते. प्रा अर्जून सरक यांचेवर आता या संस्थेच्या कामकाजाची अतिरिक्त जबाबदारी आपण सोपवली असून आपल्या कृतीतून ते निश्चितच ही जबाबदारी समर्थपणे पेलतील असा विश्वास माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर माजी जि प सदस्य दिलीपदादा तळेकर, माजी जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी जि प सदस्या सौ सवितादेवी राजेभोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, नवनाथ झोळ, उपसभापती गणेश चौधरी, माजी उपसभापती दत्ता सरडे, माजी पं स सदस्य दत्ता जाधव, माजी सभापती शेखर गाडे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयप्रकाश बिले, महेंद्र पाटील, माजी प्राचार्य मच्छिंद्र नुस्ते, समाजसेवक गणेश करे-पाटील, संस्था उपाध्यक्ष राजूशेठ गादीया, संस्था संचालक संपतलाल राठोड, राजन पाटील, संदिप कोठारी, विलास पाथ्रुडकर, प्राचार्य डाॅ अनंत शिंगाडे, प्राचार्य केशव दहिभाते, माजी प्राचार्य प्र गो मेहता, गोडसे सर, मरळ सर, ठोकळ सर, अनभुले सर, शेंडे काका, घाडगे भाऊसाहेब आदि उपस्थित होते.
यावेळी यशकल्याणी संस्थेच्या वतीने गणेश करे-पाटील यांनी प्रा अर्जून सरक यांचा मानपत्र देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार प्राचार्य केशव दहिभाते सर यांनी मानले. सूत्रसंचालन अंगद पठाडे यांनी केले. विद्या विकास मंडळाचे सचीव विलासराव घुमरे यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी सोलापूर जिल्हा परिषद, करमाळा पंचायत समिती, भारत शैक्षणिक संकुल, नारायण (आबा) पाटील पतसंस्था, ग्रामपंचायत जेऊर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ यासह अनेक संस्था यांचे वतीने प्रा अर्जून सरक यांचा सत्कार करण्यात आला.