जेऊरच्या भारत प्रायमरीची शैक्षणिक सहल उत्साहात

जेऊर, दि. ११ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली.
प्रत्येक वर्षी भारत प्रायमरी स्कूल मध्ये सहलीचे आयोजन केले जाते. यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाकणी हा सहलीसाठी विशेष असा पॉईंट निर्माण करण्यात आलेला आहे.
इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांना शाळेच्या बाहेरील जग समजावे तसेच नैसर्गिक वातावरण आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी या सहलीचे आयोजन केले होते. या ठिकाणी मुलांनी दिवसभर भरपूर निसर्ग चा आनंद घेतला तसेच विविध प्रकारची खेळणी जुन्या काळातील बैलगाडी मध्ये बसणे, उंटावरून प्रवास करणे, आगगाडीत बसून प्रवास करणे, पाळण्यात असणे रेन डान्स, दुपारी दोन वाजता झुला भोजन, वनभोजनाचा आनंद घेतला, त्यानंतर दुपारी विविध कलादर्शनाचा कार्यक्रम मुलांनी सादर केल्या.
मुलांनी नकला गाणी, विविध गाण्यावर डान्स सादर केले. तसेच ज्या मुलांना आपली कला सादर करायची आहे त्याचीही या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचाही आस्वाद मुलांनी घेतला. विशेषतः त्या मुलांना त्या ठिकाणी ज्वारीचा हुरडा शेतकरी ज्या पद्धतीने भाजून देतात त्या पद्धतीने भाजून, पाकडून खायला दिला
अशा पद्धतीने अतिशय नैसर्गिक वातावरणात ही सहल पार पडली या सहलीसाठी मुख्याध्यापक तसेच सहल प्रमुख व सर्व शिक्षक यांनी कष्ट घेतले.