‘विठ्ठल नामाची शाळा भरली! जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूल मध्ये बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन
जेऊर, दि. 24 (गौरव मोरे)-
आषाढी एकादशी निमित्तानं करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल मध्ये बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या आषाढी एकादशीमुळे जेऊर मधून अनेक दिंड्या पंढरपूरला जात असून आषाढी एकादशीच्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी भारत प्रायमरी स्कूलमध्ये बाल दिंडीचे आयोजन केले जाते, त्याच पद्धतीने यावर्षीही बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी व संत मंडळी हे जेऊरकरांचे प्रमुख आकर्षण ठरले. भजन, ओव्या गात या दिंडीचे आयोजन गावातून करण्यात आले.
संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेषात सहभाग घेतला होता. मुलींनी साड्या परिधाध केल्या होत्या तर मुलांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता.
या बाल दिंडीचे नियोजन अशा पद्धतीने केले होते की खरोखर ही बाल दिंडी पंढरपूरला चालली आहे असाच अनुभव आज येत होता. हा दंडी सोहळा सुरू असताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिल गादिया यांनी दिंडीचे स्वागत केले तर संजय दोशी यांनी सोहळ्या निमित्त मुलांना खाऊचे वाटप केले. शेवटी भक्ती गीते व भजन गाऊन या दिंडीची सांगता करण्यात आली.
या दिंडीच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष माननीय अनिल गादीया, सचिव प्रा. अर्जून सरक, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांनी अभिनंदन केले.
यावेळी दीपक व्यवहारे, अमोल पाटील, उत्तरेश्वर गरड, नितीन पाटील, वर्षा शिंदे,अनिता देशमुख, भागवत सरक, किशोर गुळमे, हजारे सर, शेख मॅडम, सरडे मॅडम आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
।