जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलमध्ये ‘दंतरोग’ आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची दंतरोग तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. कुटे, डॉ. फडतरे, डॉ. मस्के यांनी मार्गदर्शनातून सांगितले की, दररोज सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे दोन वेळा दात घासावेत, जास्त चॉकलेट खाऊ नयेत न चुकता दात घासलेच पाहिजे यासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी अतिशय उत्तम मार्गदर्शन डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना केले तसेच त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली आणि ज्यांना गरज आहे अशांना काही औषधे लिहून दिली. तसेच सर्वांना मोफत ब्रशचे वाटप केले
यावेळी भारत प्रायमरीचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.






