17/12/2024

जेऊर बसस्थानक नूतनीकरण साठी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर – माजी आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

0
IMG_20220801_131001-4-1.jpg

जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-
जेऊर बसस्थानकाचे नूतनीकरण होणार असून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना श्री पाटील यांनी सांगितले की, जेऊर व परिसरातील वीस गावांच्या दळणवळणासाठी महत्वाचे असलेले जेऊर बसस्थानक हे गेली अनेक वर्षापासून भौतिक सुविधांपासून वंचित होते. यामुळे या बसस्थानकाचे नुतणीकरण करावे अशी आग्रही मागणी आपण शासनाकडे केली व अखेर या मागणीस यश आले असून नुतणीकरण कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून राज्य परिवाहनचे पुणे प्रदेश कार्यकारी अभियंता यांचेकडून पुणे येथील अरिन डिजाइन यांना सदर कामाचे नकाशे तयार करणेबाबतचे पत्र (जाक्र।राप।काअपु।रेशा।1427) देण्यात आले आहे.

आता नुतणीकरण काम लवकरच हाती घेण्यात येणार असून यात तळमजला (300 चौ.मी) व पहिला मजला बांधकाम,पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था,विद्युतकाम,फायर फायटींग, पेव्हर ब्लाक पार्कींग, कुंपण भिंत व गेट आदी कामांचा समावेश आहे.लवकरच हे काम पुर्ण व्हावे यासाठी आपला पाठपुरावा चालू राहणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर करमाळा,कुर्डुवाडी व जेऊर बसस्थानकाचे नुतणीकरण करणार असे माजी आमदार नारायण पाटील यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुक जाहिरनाम्यातुन जनतेस शब्द दिला होता. यापैकी करमाळा व कुर्डुवाडी बसस्थानक नुतणीकरण काम हे पुर्ण झाले आहे.

आता जेऊर बसस्थानकाचे काम पूर्ण होणार असल्याने माजी आमदार नारायण पाटील यांनी जनतेस दिलेला शब्द सतत पाठपुरावा करुन प्रत्यक्ष कामातून पुर्ण केला असून तालूक्यातील जनतेकडून श्री पाटील यांचे अभिनंदन केले जात असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page