जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
जेऊर, दि. 3 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की, मराठी मातीत जन्मलेलं एक अनमोल रत्न म्हणजे अण्णा भाऊ साठे अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांनी १३ लोकनाट्य, ३ नाटके, १३ कथासंग्रह,३५ कादंबऱ्या, १ शाहिरी पुस्तक १५ पोवाडे, १ प्रवास वर्णन, ७ चित्रकथा, या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या खूप गाजल्या. जो व्यक्ती अवघे दीड दिवस शाळेत गेला या व्यक्तीची साहित्य संपदा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठेवण्यात आली हा आधुनिक युगातील एक चमत्कार आहे. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्ट करायच्या तळहातावर तरलेली आहे असे ते नेहमी म्हणत.
यावेळी उपस्थित नितीन खटके, निलेश पाटील, धनुभाऊ गारुडी, अतुल निर्मळ, आदिनाथ माने, पिंटू जाधव, सागर लोंढे, सागर बनकर, अजित उपाध्ये, अविनाश घाडगे, शिव म्हमाणे, शंकर लोंढे, रामभाऊ साळवे, हेमंत शिंदे, अभिजीत म्हमाणे, बाळासाहेब तोरमल, बंडू मोहिते उपस्थित होते.