जेऊर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी


जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-
संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅली काढून
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व सर्व महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी वीर माता सोनाबाई काटे व आजी-माजी सैनिक यांच्या हस्ते मूर्तीचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी जेऊर गावचे विद्यमान उपसरपंच नागेश झांजुर्णे आजी-माजी सैनिक रविंद्र सव्वाशे, उपाध्यक्ष भास्कर आरकिले, शिवाजी खबाले, सोमनाथ शिरस्कर, कल्याण कदम, आनंद पवार, खंडू लोंढे, ईश्वर पोळ, विश्वंबर लांडगे, तसेच दिलीप जगताप, ह.भ.प गुंडगिरे महाराज, धोकटे महाराज व जेऊर येथील मुस्लिम समाज तसेच अय्युब सय्यद आरिफ शेख उपस्थित होते.
यावेळी महिलांनी जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरूवात केली. तर शिवगर्जना पूर्वा मोहिते, आराध्या म्हमाणे तसेच तेजस्विनी पाटील, श्रद्धा जगताप, नम्रता सुपे, सिद्धेश वलटे यांनी भाषणे केली.
संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते जेऊर ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन बाळासाहेब तोरमल यांनी केले.



