07/06/2025

शिवजन्मोत्सव: जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन तर शिवजयंती मिरवणूक प्रमुखपदी हेमंत शिंदे

0
IMG_20250214_164208.jpg

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-
संभाजी ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे पारंपारिक पद्धतीने आयोजन सोलापूर जिल्ह्यातील जेऊर या अशा एकमेव ठिकाणी पारंपारिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी होणार आहे.

शिवजयंती निमित्ताने मिरवणुकीस करमाळा तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील व अनेक तालुक्यातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. व माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात याचे आयोजन संभाजी ब्रिगेडच्या वतीने मध्यवर्ती शिवजन्मत्सव समितीने केले आहे.

 

शिवजन्मोत्सव पदाधिकारी पुढीलप्रमाणे-
१) अध्यक्ष– आदिनाथ माने
२)उपाध्यक्ष- सागर कोठावळे
३) मिरवणूक प्रमुख- हेमंत शिंदे
४) मिरवणूक उपप्रमुख- राहुल जगताप
५) कार्यध्यक्ष- वैभव मोहिते
६) सचिव- दादासाहेब सूर्यवंशी
७) कोषाध्यक्ष- निलेश घाडगे
८) खजिनदार- विठ्ठल जाधव
९) सहखजिनदार- अजित उपाध्ये
१०) प्रसिद्धी प्रमुख- सचिन गारुडे
११) मिरवणूक सहप्रमुख- औदुंबर वाशिंबेकर

यावर्षी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व त्याचे पूजन आजी माजी सैनिक व माता भगिनी व शासकीय अधिकारी यांच्या हस्ते होणार व नंतर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन स्वामी विवेकानंद कार्यालयामध्ये सकाळी १० ते५ यावेळेस गावातील व तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा.

तसेच २२ फेब्रुवारीला भव्य मिरवणूक सोहळा पार पडणार असून पुढीलप्रमाणे मिरवणूक आकर्षण असणार आहे.

  • शिवराज्याभिषेक सोहळ्यात सन्मान झालेले शेटफळ (ना) येथील लेझीम पथक व सर्व ग्रामस्थ
  • शंभो वाद्य व ढोल पथक, पुणे ६० मुला-मुलींचे
  • योध्दा करिअर अकॅडमी झरे, ६० मुला-मुलींचे लेझीम पथक
  • भैरवनाथ लेझीम पथक, कोंढेज
  • लेझीम प्रेमी ग्रुप जेऊर
  • भैरवनाथ लेझीम मंडळ पांगरे
  • जेऊर व परिसरातील सर्व वारकरी सांप्रदाय यांचा सहभाग
  • श्री संत हरी हरी बाबा वारकरी शिक्षण संस्था, कोर्टी ५० मुले यांची पायी वारी
  • भैरवनाथ तालीम मंडळ लेझीम करंडी दांल पट्टा
  • छत्रपती वीर शिवाजी मर्दानी खेळ ग्रुप करमाळा
  • शिवनेरी मर्दानी खेळ व झांज पथक ५० मुला-मुलींचे, करकंब
  • श्रीराम हलगी ग्रुप व गोफ लेझीम पथक, विझोरी ४० मुलांचे
  • शिव छत्रपती रथ एन्ट्री व मावळा ग्रुप, अकलूज
  • बाभुळगांव येथील हालगी पथक
  • अंजनडोह येथील गजे ढोल व ताशा पथक
  • जेऊर परिसरातील सर्व अश्वांचा सहभाग व उंटांचा सहभाग

अशाप्रकारचे आयोजन करण्यात आल्मची माहिती जेऊर शहरअध्यक्ष अतुल निर्मळ यांनी दिली. यावेळी उपस्थित पुणे विभागीय कार्याध्यक्ष अध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटील, धन्यकुमार गारुडे, पांडुरंग घाडगे, किशोर कदम, अतुल निर्मळ, सागर बनकर, बालाजी गावडे, पिंटू जाधव, समाधान पाटील, अविनाश घाडगे, इत्यादी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page