जेऊरचे डॉ धनंजय कदम यांची सह आयुक्तपदी पदोन्नती



जेऊर, दि. 26 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील रहिवासी डॉ धनंजय बंकटराव कदम यांची सहआयुक्त पदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.
जेऊर गावचे डाॅ कदम हे 2014 च्या बॅचचे आयआरएस (IRS) अधिकारी आहेत. डॉ धनंजय बंकटराव कदम हे
2014 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची 381व्या क्रमांकाने निवड झाली होती. त्यानंतर रत्नागिरी व कोल्हापूर या ठिकाणी अनुक्रमे सहायक आयुक्त व उपायुक्त पदी त्यांनी काम केले होते.
2020-21 या वर्षी त्यांना पुणे विभागात विशेष कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट कार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 2021 पासून पुणे येथे सीमाशुल्क उपायुक्त पदी ते कार्यरत होते. नोव्हेंबर 2023 ला त्यांची बदली वस्तू व सेवा कर विभागात झाली होती. आज त्यांची पुणे येथे सहआयुक्त पदी पदोन्नती झाली आहे. त्याअनुशंगाने भारत सरकारचे सचिव एस ए अन्सारी यांनी पत्र दिले आहे. ग्रामीण भागातील डाॅ बंकटराव कदम यांना त्यांच्या यशस्वी कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

