जेऊरच्या इरा पब्लिक स्कूलच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-
जेऊरच्या इरा पब्लिक स्कूलच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदान, अस्पृश्यता निवारण यामधील त्यांचे कार्य शिक्षिका आरणे मॕडम व मोहिते मॕडम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी संस्थेचे सचिव सुनील अवसरे, अवसरे मॅडम सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.