माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन तर माजी न्यायाधीश कोळसे-पाटील यांच्या हस्ते होणार सत्कार
करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)-
माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जेऊर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी जी कोळसे-पाटील यांच्या हस्ते नारायण आबा पाटील यांचा सत्कार होणार आहे.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती प्रा डॉ. संजय चौधरी यांनी दिली.
यावेळी पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा. अर्जुन सरक, सरपंच पृथ्वीराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल उपस्थित होते. वाढदिवसाच्या कार्यक्रमांची अधिक माहिती देताना प्रा डॉ. संजय चौधरी यांनी सांगितले की शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा वाढदिवस असून दिनांक २२ आणि २३ ऑगस्ट रोजी जेऊर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक २२ रोजी भारत महाविद्यालय आयोजित कर्मयोगी व्याख्यानमाले (वर्ष १४ वे) मध्ये नामांकित राजकीय विश्लेषक व पत्रकार मा. संजय आवटे यांचे व्याख्यान सकाळी १० वाजता होणार आहे.
“महाराष्ट्राचा नाद नाय करायचा ” या विषयावर मा. संजय आवटे हे विचार व्यक्त करतील. तर सकाळी ९ वाजता मिनी मॅरेथॉन (१० किमी ) धावण्याची स्पर्धा होणार आहे. यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पंधरा हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असून तब्ब्ल २५ विजेत्या स्पर्धाकांना सुध्दा बक्षिसे दिली जाणार आहेत.
युवानेते पृथ्वीराज पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तर शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचे दुपारी दोन वाजता व्याख्यान होणार आहे. तसेच जेऊर ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या भव्य नागरी सत्कार संपन्न होणार आहे.
हा सत्कार सोहळा दुपारी ठीक २ वाजता कर्मयोगी गोविंदबापू पाटील सभागृह (बाजारतळ) येथे होईल.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तरी करमाळा माढा विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.