17/12/2024

जेऊर येथील व्यापारी उमेश पाथ्रुडकर यांचा प्रामाणिकपणा! दुकानात सापडलेले ऐवज केले परत

0
IMG_20231113_143636.jpg

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील जनरल स्टोअर्स व्यापाऱ्याचा प्रामाणिकपणा आणि माणूसकी जिवंत असल्याची प्रचिती दिसून आली असून दुकानात विसरलेले ऐवज प्रामाणिकपणे परत केले आहे.

जेऊर येथील उमेश जनरल स्टोअर्सचे मालक उमेश पाथ्रुडकर यांच्या दुकानात काल वांगी-3 येथील प्रियंका आकाश रोकडे ह्या दिवाळी खरेदीसाठी आल्या होत्या, खरेदी झाल्यावर सौ रोकडे यांचे रोख रक्कम, दोन बँकेचे एटीएम, आधार कार्ड, पॕन कार्ड विसरून गेल्या. उमेश पाथ्रुडकर यांनी सदरील आधार कार्ड वरून ओळख करून सौ रोकडे यांच्याशी संपर्क करून सदरील सर्व ऐवज प्रामाणिकपणे परत केले.

या अगोदर वर्षभरा पूर्वी उमेश पाथ्रूडकर यांनी हजारवाडी येथील शिनगारे यांचे त्यांच्या दुकानात खरेदी साठी आल्यानंतर विसरून राहिलेले सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत केले होते.

आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या काळात हरवणं तसेच विसरून जाणे ही सामान्य बाब असली तरी माणूसकी हरवत चाललेल्या या जगात माणूसकी आज ही शिल्लक असल्याचे अनुभव व्यापारी उमेश पाथ्रुडकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page