कर्मयोगी गोविंदबापू पाटील पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय गादिया तर व्हाईस चेअरमनपदी मुबारक शेख यांची निवड


जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील कर्मयोगी गोविंदबापू पाटील पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय गादिया तर व्हाईस चेअरमनपदी मुबारक शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सन 2022-2027 पर्यंत ही निवड असणार असून नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
नूतन संचालक पुढीलप्रमाणे-
1) संजय गादिया (चेअरमन)
2) मुबारक शेख (व्हाईस चेअरमन)
3) श्रीराम गोविंदराव पाटील
4) अनिल श्रीपती पाटील
5) नवीनचंद दोशी
6) शितल दोशी
7) सुनिल शहाणे
8) अर्जून पांढरे
9) श्रीकृष्ण कांबळे
10) अर्चना लुनावत
11) छाया गुटाळ
12) शांताराम सुतार- (व्यवस्थापक)
यावेळी निवडणूक निवड अधिकरी म्हणून उमेश बेंडारे, सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी काम पाहिले. तर नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले आहे.
कर्मयोगी गोविंदबापू पाटील पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांना सक्षम करण्याचे प्रयत्न असून पतसंस्थेच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्याच बरोबर मयत सभासदांच्या वारसांना सन्मानाने जगता यावे यासाठी सभासदांना विमा संरक्षण देऊन त्यांचे जीवन सुरक्षित करण्यात येत आहे. करमाळा तालुक्यातील सभासदांना गोविंदबापू पाटील पतसंस्थेमुळे खूप मोठी मदत झालेली असून पतसंस्थेची आर्थिक शिस्त अत्यंत महत्त्वाची असून ती कर्मयोगी गोविंदबापू पाटील पतसंस्थेने कायम जपली आहे. आमच्या संस्थेवर सभासद व नागरिकांचा मोठा विश्वास आहे.
श्री संजय गादिया (चेअरमन) आणि श्री मुबारक शेख (व्हाईस चेअरमन)

