जेऊर: सकल जैन समाज आक्रमक; जेऊर बंद तर मोर्चा काढून केंद्र सरकारचा केला निषेध

जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE)-
केंद्र सरकारच्या निषेधार्त आज जेऊर गाव बंद ठेवून मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
जैन समाजाचे झारखंड मधील गिरडी जिल्ह्यातील श्री सम्मेद शिखरजी हे देवस्थान केंद्र सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केल्यामुळे आज बुधवारी दुपारी वाजेपर्यंत जेऊर गाव बंद ठेवण्यात आले. गावातील जैन मंदिर ते पोलिस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलिस स्टेशनला निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.



