जेऊर बायपासच्या जेऊरवाडी चौकाचे रुंदीकरण करावे- सरपंच पृथ्वीराज पाटील यांची मागणी
जेऊर, दि. १८ (करमाळा-LIVE)-
जेऊर ते करमाळा रोडवरील जेऊर बायपासच्या जेऊरवाडी चौकाचे रुंदीकरण करावे अशी मागणी जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.
टेंभूर्णी-अहमदनगर मार्गावर जेऊर गाव असून जेऊरमध्ये रेल्वे स्टेशन असल्यामुळे जेऊर गावात लहान वाहनांसाठी भुयारी मार्ग आहे. एसटी बसेस आणि जड वाहतुकीसाठी बायपास चा वापर करावा लागतो.
जेऊर गावात जेऊरवाडी चौकात अरूंद रस्ता व उतार असल्यामुळे एसटी बस व जड वाहने येताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच वाहन चालकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्यामुळे जेऊरवाडी चौकात जागा संपादित करून अरूंद रस्ता मोठा करावे तसेच लव्हे, कोंढेज, जेऊरवाडी चौकत दिशादर्शक फलक लावण्यात यावेत अशी मागणी सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.