जेऊर येथील कांतिलाल कात्रेला यांनी केले संथरा व्रत धारण
जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील धर्मप्रेमी सुश्रावक श्री कांतिलाल कात्रेला (वय 83) यांनी जैन संत प. पु. संयमलताजी महाराज साहेब यांच्याकडून दिनांक 9 ऑगस्ट रोजी सजग अवस्थेत संथारा व्रत (मृत्यू येईपर्यंत अन्नत्याग) धारण केले आहे.
कांतिलाल कात्रेला हे जेऊर येथील सतीश कात्रेला गुरुजी शिक्षक कॉलनी यांचे वडील आहेत. कांतिलाल कात्रेला यांनी आकुर्डी येथील निवासस्थानी संथारा व्रत धारण केले आहे.
संथारा व्रत म्हणजे काय-
जैन धर्मीयांची अशी धारणा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा जैन मुनी आपलं आयुष्य परिपूर्णरीत्या जगते, शरीरानं साथ देणं सोडलं तेव्हा संथारा घेतला जातो. संथारा हा धार्मिक संकल्प असतो. त्यानंतर ती व्यक्ती अन्नत्याग करते आणि मृत्यूला सामोरं जाते. संथाऱ्याचा उद्देश हा आत्मशुद्धीचा असतो. यामध्ये परिग्रह असतो. कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष मिळवणे हा मनुष्य जन्माचा उद्देश असतो आणि त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी संथाराचं साहाय्य मिळते. संथारा घेण्याची धर्माज्ञा गृहस्थाला तसेच मुनी किंवा साधूला आहे.