मकाई कारखान्याच्या रणधुमाळीत बागल गटाला धक्का; भिलारवाडी येथील कार्यकर्त्यांचा पाटील गटात प्रवेश
जेऊर, दि. 18 (करमाळा-LIVE)-
आज जेऊर येथे ऐन मकाई कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी बागल गटाच्या आजी-माजी कार्यकर्त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली व करमाळा तालुक्याच्या महिला नेत्या जिल्हा परिषद सदस्य सौ.सावितादेवी राजेभोसले यांच्या उपस्थितीत प्रवेश पाटील गटात प्रवेश केला.
माजी सरपंच रामचंद्र तात्याराम येडे, माजी सरपंच अंकुशराव पांडुरंग अंबघरे, माजी सरपंच भारत नारायण गिरंजे, बाबुराव काशिनाथ अंबघरे, माजी सरपंच राजू उगलमोगले, भीमराव पांडुरंग मेरगळ, हरिश्चन्द्र कृष्णा अंबघरे, भारत गोरख डोळे, आजिनाथ रामदास अंबघरे, बाबुराव मुरलीधर वळेकर, महेंद्र विश्वनाथ गोडसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पाटील गटात प्रवेश केला.
यावेळी माजी सभापती अतुल पाटील, युवा नेते अजित तळेकर, महेंद्र पाटील, सरपंच शाम ओंबासे, प्रा.अर्जुन सरक, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, नारायण पाटील मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष प्रा.डॉ.संजय चौधरी, वाघमोडे सर, गणेश घोरपडे, केसकर आण्णा, विनोद बाबर, संजय फडतरे उपस्थित होते