संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे शिवजयंती मिरवणूक सोहळा पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा

जेऊर, दि. २४ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने सनई चौघडा व टाळ मृदंगाच्या व ढोल ताशाच्या गजरामध्ये शिवजयंती मिरवणूक उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली.
यावेळेळी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन माता-भगिनी व वारकरी संप्रदाय व जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते मूर्तीस पुष्पहार घालून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी अहिल्यामाता होळकर, राजश्री शाहू महाराज, संत गाडगे महाराज व इतर महापुरुषांची एक हजार पुस्तके उपस्थितांना वाटप करण्यात आली. यावेळी लहान मुला-मुलींनी राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवराय, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फतिमा शेख,व माता रमाई यांच्या वेशभूषेतील रणरागिनी घोड्यांवर स्वार झाल्या. घोडे आणि उंटांचा समावेश होता.
जेऊर आणि शेटफळ व कोर्टी येथील वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी टाळ, वीणा, मृदंगाच्या गजरात मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. रथामध्ये सजावट केलेली आकर्षक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लक्ष वेधून घेत राहिली. हा रथ विद्युत रोशनाईने झळाळून निघाला. रथाच्या समोरील बाजूस मावळ्यांची वेशभूषा करून तरुणाईने लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीस लक्षवेधी ठरले शेटफळ (ना) येथील लेझीम पथक शेटफळ येथील ग्रामस्थांचा यामध्ये सहभाग होता.योद्धा करिअर अकॅडमी येथील मुलांनी व मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर व देश गीतावर लेझीम सादर केले.
तसेच कोंढेज व पांगरे येथील ग्रामस्थांनी जुन्या पारंपरिक पद्धतीने लेझीम सादर केले.व जेऊर येथील लहान मुले व मुली यांचा देखील लेझीम पथकामध्ये समावेश होता. कोल्हापूर येथील लेझीम करंडी व दांडपट्टा व छत्रपती वीर शिवाजी महाराज ग्रुप व शिवनेरी मर्दानी खेळ व झांज पथक व श्रीराम हलगी ग्रुप व गोफ लेझीम पथक तसेच बाभूळगाव येथील हलगी पथक व स्वराज्य मर्दानी खेळ सर्व पथकांनी आकर्षक अशी कला सादर केली. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सर्व शिवप्रेमींसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या कार्यक्रम यशस्वी केला.