जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
जेऊर, दि.११ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील संभाजी ब्रिगेड च्या संपर्क कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.यावेळी बोलताना किशोर कदम म्हणाले की, महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला संत परंपरेचा थोर वारसा लाभला आहे. त्यांचा सामाजिक समतेवर विश्वास होता. त्यांनी स्त्री-पुरुष भेदभाव उन्नती हक्क जातिभेद सामुदायिक विवाह समाजात अस्पृश्यता प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य सर्वांगीण विकास क्षेत्रात उन्नती यांचा अंगीकार केला होता. त्यांचा बालविवाहास विरोध होता आणि विधवांच्या पुनर्विवाहाला त्यांनी मान्यता दिली देवाला यापेक्षा देहालयाचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करणारे संत म्हणून महात्मा बसवेश्वराकडे पाहिले जाते. बसवेश्वर यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील इंगलेश्वर बागेवाडी या गावी ११०५ मध्ये झाला. मध्ययुगातील भारताच्या धार्मिक सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून महात्मा बसवेश्वरांची ओळख अवघ्या देशाला आहे.अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणे अहंकाराचा नाश करणे ही त्यांची प्रतिज्ञा होती.
बसवेश्वर हे गरिबांचे कैवारी होते आपली संपत्ती लोकसेवेसाठी खर्च करण्याचे त्यांनी ठरवले होते समता हे तत्व त्यांच्या धर्म प्रसाराचे प्रमुख सूत्र होते. आपण जे कमवतो त्यात ईश्वराचा वाटा आहे. म्हणून त्यातील दिन दुःखीच्या जीवन कल्याणासाठी दानधर्म केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला होता. असे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित पुणे विभागीय संभाजी ब्रिगेड अध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटील, धन्यकुमार गारुडे, अतुल निर्मळ, पांडुरंग घाडगे, आदिनाथ माने, किशोर कदम, पिंटू जाधव, अजित उपाध्ये, सागर लोंढे, अविनाश घाडगे इत्यादी उपस्थित होते.