वीटच्या सार्थक ढेरे ने जिंकली जेऊर मॅरेथॉन स्पर्धा ; मॕरेथाॕन स्पर्धेत चारशे स्पर्धाकांचा सहभाग

जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)-
माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेऊर करमाळा येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.करमाळा तालुक्यात प्रथमच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगले नियोजन करण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे १५ हजार ५५५ रुपये रोख रकमेचे बक्षीस वीट ता. करमाळा येथील सतरा वर्षाच्या सार्थक ढेरे याने पटकवले.सार्थक याने १० किमी अंतर अवघ्या ३४ मिनिटात पार केले व स्पर्धा जिंकली. तर विनायक तोडकर करमाळा याने दुसऱ्या क्रमांकावर येऊन ११ हजार १११ रुपयाचे बक्षीस जिंकले.तसेच सौरभ भराटे, सावडी तिसरा क्रमांक ७ हजार ७७७ जिंकले. तसेच धुळा वाघामोडे, धायखिंडी, ओम मारकड, दिलमेश्वर, राहुल माने (वरकटणे ), यश घाडगे (वरकटणे), नागेश दोंड (केम), अभिजित पानढरकर (पोंदवडी), केशव तळेकर (सावडी), अशोक तरंगे (भालेवाडी) मयूर जाधव (तरपगाव), किरण शिंदे (जेऊर), ओंकार निकम (साडे), शुभम काळे ( करंजे ) यशराज लवले (मलवडी), सार्थक वळेकर (जेऊर), सार्थक कोळेकर (जेऊर), हरिओम होगले (घारगावं), अनिकेत मोरे (वांगी ), स्वप्नील आदलिंग (मोरवड), शुभम सरक (लव्हे), महेश भांगे (लव्हे), अविनाश बाबर (लव्हे) अविनाश बाबर (जेऊर), गणेश पवार ( फिसरे ), शिवाजी बाथखबर (भालवणी ), आदित्य सरडे ( करंजे ) गणेश कोडलिंगे (जेऊर), विशाल घाडगे (बोरगावं), अनुष्का शिंदे (भाळवणी), बी के कदम सर (वय 55 वर्षे ) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.






