18/12/2024

जेऊर येथे स्तनपान सप्ताह कार्यक्रम संपन्न

0
IMG-20230808-WA0072.jpg

जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे आज एकात्मिक बाल विकास प्रकल्प करमाळा अंतर्गत पर्यवेक्षिका आतकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर येथील बाजारतळातील सभागृहात स्तनपान सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी ज्योतिताई नारायण पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. १ आॕगस्ट ते ८ आॕगस्ट पर्यंत स्तनपान सप्ताह कार्यक्रम सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा राबवून व गरोदर माता, स्तनदा माता, यांना जास्तीत जास्त माहिती व आरोग्य विषयक काळजी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाते.

यावेळी महिलांनी, किशोरवयीन मुलींच्या रांगोळी, मेंहदी अशा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पर्यवेक्षिका आतकर मॅडम यांनी गरोदरपणात व स्तनपान माता यांनी आपल्या बाळाला स्तनपान कसे करावे व व त्यांचा आहार कसा असावा असे अनेक विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती मार्गदर्शन केले.

तसेच ज्योतीताई पाटील यांनी अंगणवाडी च्या माध्यमातून सर्व सेविका, मदतनीस या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व महिलांना माहिती पोहचवतात, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक महिलांना मार्गदर्शन मिळते व त्याचा फायदा अनेक मातांना होतो असे सांगितले. त्यानंतर मेहता मॅडम यांनी ही बालसंगोपन माहिती व सुंदर असे एक कविता म्हणून आपले विचार मांडले. तसेच रोकडे मॅडम व म्हेत्रे सर यांनी आपल्या जीवनातील धावपळ सुरू असणाऱ्या या मनावर असलेले ताण तणाव कमी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले.

यावेळी या कार्यक्रमास ज्योतीताई पाटील, आतकर मॅडम मेहता मॅडम, रोकडे मॅडम, जगताप मॅडम, माळी मॅडम, म्हेत्रे सर, माने सर, माळी गुरुजी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका मंगल दामले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अंगणवाडी सेविका आशा चांदणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व इतर महिला उपस्थित राहून कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page