जेऊर येथे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने भगवान महावीर जयंती निमित्ताने पालखीचे स्वागत

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ
ब्रिगेडच्यावतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक प्रारंभी पुष्पहार अर्पण करून पालखी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले, भगवान महावीर यांच्या अहिंसा आणि अपरीग्रह या दोन महान मानवी मूल्यांवर सकल जैन धर्माचे विचार मानव जातीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत.
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, बाळासाहेब सुर्यवंशी, निलेश पाटील, जेऊर शहराध्यक्ष अतुल निर्मळ, आजिनाथ माने, सोमनाथ जाधव, सागर कोठावळे, धनंजय गारुडी, हेमंत शिंदे, पांडुरंग घाडगे इत्यादी उपस्थित होते.