करमाळा नगरपालिकेची पाईपलाईन जेऊर येथे फुटली; हजारो लिटर पाणी वाया

करमाळा, दि. 26 (करमाळा-LIVE)-
करमाळा नगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जेऊर येथील चिखलठाण रोड येथे फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून प्रशासनाकडून याची दुरूस्तीचे काम सुरू झालेले आहे. तर येत्या दोन तीन दिवसांत करमाळा शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.
जेऊर येथे चिखलठाण रोड परिसरात करमाळा नगरपालिकेची पाईपलाईन फुटलेली असून यामुळे हजारे लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. लवकरात लवकर पाईपलाईन दुरूस्ती करावी अन्यथा, करमाळा शहराला पाणी कमी दाबाने मिळण्याची शक्यता आहे.
आनंद मोरे, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.


