संभाजी ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा प्रियंका खटके यांनी केले अनोख्या पध्दतीने गौरी पुजन


जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष प्रियांका खटके यांनी यावर्षी अनोख्या पध्दतीने गौरी पुजन करून समाजात आदर्श निर्माण केला.
स्वराज्याचे दोन छत्रपती घडवले व अंधश्रद्धेला खतपाणी न घालता पुण्याची भूमी नांगरली त्या पुण्याला आज विद्येच माहेरघर म्हणले जाते अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, महाराणी ताराराणी. तसेच ज्या मातेने सती न जाता स्वतः राज्य कारभार केला व समाजापुढ एक आदर्श निर्माण केला अशा अहिल्यादेवी होळकर, शिक्षणाची जननी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले व सहशिक्षिका फातिमा शेख तसेच डॉ.बाबासाहेबांना त्यांच्या जिवनात सहकार्य करणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवून गौरी पूजन केले.
ह्याच खऱ्या आमुच्या महालक्ष्मी असून यांचेच घरोघरी पूजन झाले पाहिजे असा आदर्श समाजात प्रियंका खटके यांनी निर्माण केला आहे.


- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर