संभाजी ब्रिगेडच्या वतीने जेऊर शंभर टक्के बंद
जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व इतर महापुरुषांची वारंवार होत असणारी बदनामी थांबवण्याबाबत संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर निषेध करून जेऊर 100% कडकडीत बंद करण्यात आले.
यावेळी उपस्थित नितीन खटके (संभाजी ब्रिगेड पुणे विभागिय कार्याध्यक्ष), सुहास पोळ (तालुकाध्यक्ष- संभाजी ब्रिगेड करमाळा), भाऊसाहेब साबळे (संभाजी ब्रिगेड ता उपाध्यक्ष), बालाजी गावडे (ता. कार्याध्यक्ष), अतुल निर्मळ (संभाजी ब्रिगेड जेऊर शहराध्यक्ष), बाळासाहेब कर्चे, राकेश पाटील (राष्ट्रवादी युवक काँग्रेस ता उपाध्यक्ष करमाळा), सुनिल अवसरे, सुहास सुर्यवंशी, आजिनाथ माने, नामदेव लोंढे (मेजर), दादासाहेब थोरात, सागर बनकर, रोहन गरड, सचिन गारूडी, गणेश नाईकनवरे, बाळासाहेब तोरमल,पप्पू कांडेकर, शारदाताई सुतार, निलेश पाटील, संकेत गरड, श्रीहरी आरणे, अविनाश घाडगे, सतिश शिंदे, अर्जुन आवारे, सागर चाकणे, रणजित कांबळे, नितीन घाडगे, अभिजीत म्हमाणे आदी उपस्थित होते.
जेऊर बंदला व्यापारी वर्ग व ग्रामस्थ यांचा बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाला असून संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने जेऊर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांना निवेदन देण्यात आले व यावेळी त्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना त्यांच्या वाचाळविरांना आवरले नाही तर संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्ह्यात यांचा कुठेही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.