भाळवणी येथील श्री दत्त इंजिनियरींग वर्क्स ला उत्कृष्ट उद्योजक म्हणून महाएॕग्रो आयडॉल पुरस्कार
करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-
भाळवणी येथील रहिवासी सुशील चव्हाण यांच्या श्री दत्त इंजिनियरींग वर्क्स ला यावर्षीचा 15 वा राष्ट्रीय महाऍग्रो आयडॉल पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
भाळवणी येथील श्री दत्त इंजिनिअरिंग वर्क्स यांना कृषी अवजारे संशोधक व उद्योजक म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. नुकताच नाशिक येथे 15 वा राष्ट्रीय महाऍग्रो आयडॉल पुरस्कार सोहळा संपन्न झाला. भाळवणी गावचे दाम्पत्य सुशील चव्हाण आणि पूजा चव्हाण यांचे श्री दत्त इंजिनियरींग वर्क्स हे दुकान आहे.
यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आबासाहेब मोरे, संस्था अध्यक्ष भूषण निकम, संयोजिका रोहिणी पाटील व कृषी व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या य हस्ते प्रदान करण्यात आला.
सुशिल चव्हाण यांनी शेतीमध्ये उपयोगी अनेक अवजारांचे संशोधन केले असून भाळवणी येथे त्यांचा श्री दत्त इंजीनियरिंग वर्क्स या नावाचे शेती अवजारे बनवण्याचा वर्कशॉप आहे स्वतः संशोधन व प्रगत तंत्रज्ञान वापरून कृषी क्षेत्रासाठी आवश्यक ऊस लावणी यंत्र उसाची आंतरमशागत व खत पेरणी यंत्र सर्व प्रकारची पेरणी यंत्रे याचे संशोधन करून अवजारांची निर्मिती केली आहे.